BREAKING

Uncategorized

Rinku Singh To be Wife Priya Saroj Got Emotional After Their Engagement Cried on Stage Video Viral

भारतीय क्रिकेट संघाचा फिनिशर रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाची खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा आज रविवार, ८ जून रोजी लखनौ येथे पार पडला. गेल्या कित्येक दिवसांपासून या दोघांच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा होती. आता या दोघांचाही साखरपुडा झाल्याचे अनेक फोटो, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेक वरिष्ठ व्यक्ती, राजकारणी या साखरपुड्याला उपस्थित होते. दरम्यान साखरपुडा झाल्यानंतर प्रिया सरोज भावुक झाली. ज्याचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.

Site Subscription Price Supported Countries
FuboTV 5-day free trial, $10–$90/month USA, Canada, Spain
ESPN+ $11.99/month USA
Fanatiz €6.99–€10.99/month Worldwide
StreamLocator 7-day free trial, no credit card required! $9.90/month Worldwide
Advertisement

रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचा साखरपुडा समारंभ लखनौमधील हॉटेलमध्ये पार पडला. लखनौमधील द सेंट्रम हॉटेलमध्ये एका खाजगी समारंभात खासदार प्रिया सरोजशी साखरपुडा करत एका नव्या इनिंगला सुरूवात केली आहे. या कार्यक्रमात जवळचे कुटुंबीय, मित्र आणि राजकारणी तसेच क्रिकेट जगतातील निवडक पाहुणे उपस्थित होते.

समारंभाच्या आधी, रिंकूने आपल्या कुटुंबासह उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील चौधरा वली विचित्रा देवी मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला. हे जोडपं पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या पोशाखात एकत्र कार्यक्रमस्थळी पोहोचले. त्यापूर्वी दोघांच्याही फोटोशूटचे फोटो आणि व्हीडिओ समोर आले होते. रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांनी एकमेकांचा हात धरत हॉलमध्ये प्रवेश केला. जिथे अनेक पाहुणे राजकारणी उपस्थित होते. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, त्यानंतर समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, जया बच्चन व पक्षाच्या इतर वरिष्ठांनीही उपस्थिती लावली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Site Subscription Price Supported Countries
FuboTV 5-day free trial, $10–$90/month USA, Canada, Spain
ESPN+ $11.99/month USA
Fanatiz €6.99–€10.99/month Worldwide
StreamLocator 7-day free trial, no credit card required! $9.90/month Worldwide
Advertisement

रिंकू सिंह-प्रिया सरोजच्या साखरपुड्याचा फोटो (फोटो सौजन्य-X)

रिंकू सिंह आणि प्रिया सरोज स्टेजवर गेल्यानंतर त्यांचा साखरपुडा पार पाडला. यानंतर दोघांचा एकत्र फोटो घेत असताना खासदार प्रिया सरोज भावुक झाली. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. प्रियाला तिच्या भावना आवरत येत नसल्याने ती सर्वांकडून पाठ करूनही रडताना दिसली. तर रिंकू सिंह तिची समजूत घालताना दिसत आहे. या क्षणाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

Related Posts